परदेशातून आलेल्या 15 लाख लाेकांकडे दुर्लक्ष झाल्याने घात, यामुळे कोरोना संसर्गाचा धोका वाढला

नवी दिल्ली : गेल्या दोन महिन्यांत १५ लाख लोक परदेशातून भारतात आले. मात्र, त्यांच्यावर लक्ष न ठेवता दुर्लक्ष करण्यात आले. यामुळे कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे. कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी केंद्रशासित प्रदेशांसह राज्यांच्या मुख्य सचिवांना पाठवलेल्या पत्रात हे नमूद केले आहे.


१८ जानेवारी ते २३ मार्चदरम्यान परदेशातून १५ लाखांवर लोक भारतात आले. ब्युरो ऑफ इमिग्रेशन व आरोग्य मंत्रालयाने या लोकांवर लक्ष ठेवण्याची सूचना केली होती. मात्र, राज्य सरकारांनी परदेशातून आलेल्या नागरिकांची दिलेली संख्या व ब्युरो ऑफ इमिग्रेशनच्या संख्येत तफावत आहे. परदेशातून आलेल्यांपैकी अनेक कोरोना पॉझिटिव्ह ठरले. आरोग्य मंत्रालयानुसार, १.८७ लाख लोकांवर लक्ष ठेवले जात अाहे. नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांच्यानुसार, हे लोक परतले तेव्हा कोरोनाचा विषय इतका गंभीर नव्हता.


मोठी किंमत चुकवावी लागेल...


यंत्रणेतील बेजबाबदारपणाची किंमत चुकती करावी लागेल. भारतात तत्काळ निदान करणारी किट‌्स नाहीत. ती मिळाली तर १० ते ३० मिनिटांत निदान होईल. चीन व डब्ल्यूएचओच्या मदतीने हे शक्य होईल. डॉ. एम. सी. मिश्रा, एम्सचे माजी संचालक


मोठी तयारी... भारतात ५ लाख तपासणी किट, आणखी ३४ लाख मागवले


कारण, सर्वाधिक चाचणी करणाऱ्या द. कोरियाने स्थिती नियंत्रणात आली. अमेरिका मागे आहे. अमेिरकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३ दिवसांपूर्वी केलेल्या दाव्यानुसार, अमेरिकेत सर्वात जास्त चाचण्या होतील. चाचणी संख्येनुसार त्यांचे वक्तव्य योग्य होते, मात्र लोकसंख्येच्या प्रमाणात आहे. अमेरिका १ लाख लोकांत सरासरी १७५ लोकांची चाचणी करू शकली.मात्र, भारत खूप मागे आहे.


चाचणीत इटली अमेरिकेपेक्षा खूप मागे






























देशएकूण चाचण्या1 लाखांमागे
द. कोरिया5.8 लाख700
इटली3.5 लाख600
अमेरिका3.5 लाख175
भारत27 हजार2


  • भारतात चाचणी अहवालास ४ ते ६ तास लागतात. चीनमध्ये ३० मिनिटांत येतो.

  • भारतात ७० हजार चाचणी किट. ५ लाख किट शुक्रवारी दाखल. भारताने अनेक देशांतून ३४ लाख किट मागवले आहेत.